साबणाच्या वडीतून कोकेनची तस्करी करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली असून त्याच्या जवळून ३३ कोटी किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केली आहे. अटक करण्यात आलेला तस्कर हा आदिस अबाबाहून इथिओपियन एअरलाइन्स मार्गे मुंबईत दाखल झाला होता.
( हेही वाचा : लोकशाहीवर दमदार भाषण देणाऱ्या ‘त्या’ चिमुरड्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले)
१६ साबणाच्या वड्यांमध्ये आढळले कोकेन
१ फेब्रुवारी रोजी इथिओपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ET-640 द्वारे आदिस अबाबाहून मुंबईला एक भारतीय नागरिक अंमली पदार्थची मोठी खेप घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआयआरने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका संशयाताला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील सामानाची तपासणी केली असता त्याच्या सामानात १६ साबणाच्या वड्या आढळून आल्या, या साबणाच्या वड्यांमध्ये मेणासारख्या थराखाली काहीतरी लपविल्याचे आढळून आले. डीआयआरच्या अधिकाऱ्यांनी बाहेरील मेणाचा थर काढून टाकला असता, त्यात संशयास्पद पावडर आढळून आली. ही पावडर तपासली असता ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
डीआरआयने जप्त पदार्थाचे वजन ३३६० ग्रॅम असून आहे, त्याची अवैध बाजारात किंमत अंदाजे ३३.६० कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआयने दिली. अमली पदार्थ तस्करांनी तस्करी करण्यासाठी नवीन क्लुप्ती शोधून काढली होती अशी माहिती डीआयआरच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community