महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या वतीने शीव-माहीम जोडरस्त्यावर सुरु असलेले बॉक्स ड्रेन व धारावीत ९० फूट रस्त्यावर सुरु असलेले मायक्रो टनेलिंग प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून बॉक्स ड्रेनचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर समांतरपणे चार विविध संस्था कार्यरत आहेत. ही कामे पूर्ण होऊन यंदाच्या पावसाळ्यात शीव रेल्वे परिसर आणि धारावी परिसराला पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा : महापालिकेच्या तिजोरीत यंदा उत्पन्नाची रक्कम होणार कमी जमा)
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या वतीने शीव-माहीम जोडरस्त्यावर सुरु असलेले बॉक्स ड्रेन व धारावीत ९० फूट रस्त्यावर सुरु असलेले मायक्रो टनेलिंग प्रकल्प येथे भेट देऊन आढावा घेतला. येथील मायक्रो टनेलचे काम प्रगतिपथावर असून बॉक्स ड्रेनचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पावर समांतरपणे चार विविध संस्था कार्यरत आहेत. ही कामे होवून यंदाच्या पावसाळ्यात शीव रेल्वे परिसर आणि धारावी परिसराला पाणी साचण्यापासून दिलासा मिळेल, याचा प्रशासनाला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भरतीच्या काळात पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी धारावी येथे लघु उदंचन केंद्र उभारण्यात येत आहे. पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय आणि कांदळवन कक्ष यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर हे काम सुरू केले जाईल. हे लघु उदंचन केंद्र पुढील ६ ते ८ महिन्यांत उभारले जाईल. तर २०२४ च्या पावसाळ्यापूर्वी ते कार्यान्वित केले जाईल. हे लघु उदंचन केंद्र पावसाळ्यात भरतीच्या अधिक काळातही पूर नियंत्रण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी पश्चिम उपनगरातील पटवर्धन पार्क, वांद्रे (पश्चिम) व पुष्पा नरसी पार्क, जे.व्ही.पी.डी. स्कीम, अंधेरी (पश्चिम) येथे भेट दिली. स्थानिक आमदार व नागरिकांच्या मागणीनुसार वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ बांधण्याची मागणी करण्यात आली. भेटीदरम्यान स्थळ पाहणी करून सदरच्या उद्यानाखालील जागेत भूमिगत वाहनतळ बांधण्याकरिता निविदा मागण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. या पाहणीप्रसंगी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (प्रभारी) प्रकाश सावर्डेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community