इंटिरिअर डिझाइनर्सच्या नोकऱ्या धोक्यात? ‘या’ सोप्या प्रक्रियेद्वारे स्वत:च सजवा आपले घर!

141

आपले हक्काचे घर सजवण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. घरामध्ये कोणत्या दिशेला काय हवे? घरातील प्रत्येक डिझाईन, रंगकाम, कपाटे, वस्तू कशाप्रकारे सजवता येतील याबद्दल रिसर्च केला जातो. घरात सजवण्यासाठी इंटिरिअर डिझाईनरची मदत घेतली जाते. हे इंटिरिअर डिझाईनर्स कोणत्या दिशेला काय ठेवावे, कशामुळे आपले घर अधिक सुंदर दिसेल, फर्निचरची रचना, किचनचे डिझाईन कशाप्रकारे असावे याची सर्व माहिती देत हे डिझाईनर्, घर अधिक सुंदर बनवण्यात आपली मदत करतात. परंतु अलिकडच्या महागाईच्या काळात प्रत्येकालाचा इंटिरिअर डिझाईनरची मदत घेणे शक्य होत नाही. आधीच गृहकर्ज त्यात इंटिरिअरसाठी आणखी खर्च कुठून करणार असे अनेक प्रश्न सामान्य माणसांच्या मनात येते. यावर उपाय म्हणून आता अशा ऑनलाईन वेबसाईट्स आल्या आहेत जिथे तुम्ही घरातील जागेचे मोजमाप अ‍ॅड अगदी सहज तुमचे घर डिझाईन करून घेऊ शकता, यामुळे तुमच्या पैशांचीही बचत होईल.

( हेही वाचा : ‘तेजस’चे उतरले ‘तेज’; पैसे फुल, सुविधा गुल )

हक्काच्या घराचे डिझाईन स्वत:च करा

प्रत्येकाकडेच इंटिरिअर डिझानिंगचे ज्ञान नसते आणि अनेकदा इंटिरिअर डिझाईनरला देण्याइतपत पैसेही नसतात. असे सर्व लोक रुम प्लॅनर अ‍ॅप (room planner) किंवा तुम्ही जर संगणक, आयफोनवर डिझाईन करणार असाल तर तुम्ही रुमटोडो (roomtodo) या वेबसाईटच्या आधारे आपले घर डिझाईन करू शकता. रुम प्लॅनर हा अ‍ॅप सुरू झाल्यावर तुम्हाला विविध template उपलब्ध होतील त्यानंतर तुम्ही घराचे माप घेऊन मेजरमेंट अ‍ॅड करू शकता, यानंतर तुम्हाला तुमचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा 3D View द्वारे दर्शवावे लागेल. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामार्फत तुम्ही स्वत:चे घर अगदी सहज डिझाईन करू शकता.

New Project 11 1

हॉल, किचन, बेडरूम या तिन्ही खोल्यांमधील फर्निचर तुम्हाला कोणत्या प्रकारे ठेवायचे आहे, रंग कसा हवा अशा सर्व गोष्टी तुम्ही 3D View मध्ये बनवू शकता. तुमचे अंतिम डिझाईन तयार झाल्यावर रेंडर कर (Final design Process), रेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्ही हा अ‍ॅप बंद करू नका यानंतर तुम्ही तयार केलेला प्लॅन तुमच्या मोबाईल स्क्रिनवर तुम्हाला तयार मिळेल. अशाप्रकारे तुम्ही अगदी सहज स्वत:चे घर माफक दरात सजवू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.