राणे -राऊत वाद आता न्यायालयात; राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

149

शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे आता राजकीय आरोप- प्रत्यारोप असणारे हे प्रकरण न्यायालयात जाणार आहे. नारायण राणे यांनी 15 जानेवारी रोजी केलेल्या वक्तव्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राऊत यांना खासदार बनवण्यासाठी मी पैसे खर्च केले, असे नारायण राणे म्हणाले होते. आता न्यायालयात नारायण राणे संजय राऊत यांच्या नोटीसला काय उत्तर देतात, ते पाहावे लागणार आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे ?

2004 मध्ये संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी आम्ही पैसे खर्च केले. तसेच, संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते. राणे यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत संजय राऊत यांचे म्हणणे आहे की, माझे मतदार यादीत नाव नव्हते हे नारायण राणे यांनी सिद्ध करुन दाखवावे. तसेच, राज्यसभेत निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केले आहेत, म्हणजे नेमके काय केले आहे, असे पैसे खर्च करणे म्हणजे अॅंटिकरप्शन अंतर्गत हे प्रकरण येते, असा दावा संजय राऊत यांनी केला.

( हेही वाचा: लोकशाहीवर दमदार भाषण देणाऱ्या ‘त्या’ चिमुरड्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले )

आरोप सिद्ध करावे

संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे सर्व दावे खोडून काढले. ते म्हणाले की, नारायण राणे म्हणतात, मी संजय राऊत यांना खासदार केले. मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण होते? मला खासदार शिवसेना प्रमुखांनी केले. नारायण राणे यांना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केले. आम्हाला सर्व पदे बाळासाहेबांनी दिली. तसेच, 2004 मध्ये माझे मतदार यादीत नाव होते. माझे मतदार यादीत नाव नव्हते. हे ते खोटे बोलत आहे. मला आता त्याविषयी काही बोलायचे नाही, त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. शिवसेनेचे सर्वच नेते असे खटले दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.