वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त असतानाच आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. अमूल दुधात लिटरमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे. 3 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोनच दिवसांत सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. याचा पहिला परिणाम सोने- चांदीच्या दरांवर दिसून आला आहे. त्यानंतर आता देशातील सर्वात मोठी दूध वितरक कंपनी अमूल दुधाच्या किमतीत प्रतिलीटर 3 रुपयांनी वाढ केली आहे.
( हेही वाचा: IIT Bombayमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा )
‘असे’ आहेत नवे दर
आता अमूलची अर्धा लीटरची दुधाची पिशवी विकत घेण्यासाठी 27 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 1 लीटर दुधासाठी 54 रुपये द्यावे लागणार आहेत. अमूल गोल्ड म्हणजेच फुल क्रीम दुधाचे अर्धा लीटरचे पाकिट आता 33 रुपयांना मिळणार आहे. तसेच, 1 लीटरसाठी 66 रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गायीच्या दुधाची 1 लीटरची किंमत आता 56 रुपये इतकी झाली आहे. तर अर्धा लीटर दुधासाठी 28 रुपये द्यावे लागणार आहेत. तर म्हशीचे A2 दूध आता 70 रुपये प्रतिलीटर किमतीला मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community