विधान परिषजेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 30 तासांनंतर या निवडणुकीचा निर्णय समोर आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले असून, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. अमरावती विभागात हा भाजपला मोठा झटका मानला जात आहे.
( हेही वाचा: ‘सांगा अदानीला किती कर्ज दिले?’; RBIचे बँकांना आदेश )
अवैध मतांच्या मोजणीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पुढे होते. त्यामुळे अमरावतीत मतमोजणीवरुन राजकीय नाट्य रंगल्याचे दिसून आले. धीरज लिंगाडे 3 हजार 368 मतांनी विजयी झाले आहेत.
अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत होती. गुरुवारी दुपारी धीरज लिंगाडे हे 2 हजार मतांनी आघाडीवर होते. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. शुक्रवारी सकाळी पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे या मतमोजणीत कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखरे मविआच्या धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली.
Join Our WhatsApp Community