राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांना ‘गौरव श्री सन्मान २०२३’ प्रदान

135

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ३ फ्रेब्रुवारी २०२३ रोजी उद्योग, व्यवसाय, कला व समाजकार्य या विषयामध्ये कार्य करणाऱ्या ४० गुणवंत व्यक्तींना राजभवन येथे ‘गौरव श्री सन्मान २०२३’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

( हेही वाचा : मराठा समाजाला झटका! विद्यार्थ्यांना EWS विभागातून अर्ज करण्याची मुभा देणारा निर्णय मॅटने ठरवला अवैध)

मैत्री पीस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याला फाउंडेशनचे अध्यक्ष बौद्ध भिक्खू सुरजित बरुआ, संगीतकार अनू मलिक व बुद्धांजली आयुर्वेदचे कैलाश मासूम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी संगीतकार अनु मलिक, अभिनेते राजपाल यादव, उद्योजक अजय हरिनाथ सिंह, डॉ. प्रसन्न पाटणकर, सम्बुद्ध धर, सचिन साळुंके, दीपक बरगे, सुनील निखार, परवेझ लकडावाला आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.