7th Pay Commission: सरकारी कर्मचा-यांच्या पगाराबाबत मोठी बातमी

147

केंद्र सरकारकडून नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ज्यात कररचनेमध्ये झालेल्या बदलाबाबत मोठी घोषणाही करण्यात आली. हे सर्व सुरु असतानाच सरकारी कर्मचा-यांच्या वेतनवाढीसंदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे.

जवळपास 65 लाख कर्मचारी आणि 48 लाख निवृत्तीवेतनाचे लाभार्थी यांना मिळणा-या महागाई भत्त्यासंदर्भात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चर्चा होणार आहे.

रोजगार मंत्रालयाकडून AICPI इंडेक्सच्या आकडेवारीमध्ये नोव्हेंबर महिन्यानंतर घट झाली आहे. ज्याचे थेट परिणाम DA होणा-या वाढीवर होणार आहेत. 2022 या वर्षांमध्ये जुलै महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत AICPI इंडेक्समध्ये सातत्याने वाढ होत होती. पण, डिसेंबर महिन्यात मात्र परिस्थिती बिघडल्याचे लक्षात आले आहे. ज्यामुळे 1 जानेवारीपासून महागाई भत्त्यामध्ये होणारी अपेक्षित वाढ कमी असू शकते. जिथे ऑक्टोबर महिन्यात AICPI इंडेक्सचा आकडा 132.5 इतका होता तिथे तो डिसेंबरमध्ये मात्र 132.2 वर पोहोचला.

( हेही वाचा: मराठा समाजाला झटका! विद्यार्थ्यांना EWS विभागातून अर्ज करण्याची मुभा देणारा निर्णय मॅटने ठरवला अवैध )

कर्मचा-यांचे नुकसान किती?

केंद्राकडून 31 जानेवारीलाच AICPI इंडेक्सची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे आता Labour Ministry च्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे कर्मचा-यांच्या डीएमध्ये होणारी 4 टक्के वाढ 3 टक्क्यांवरच थांबू शकते. थोडक्यात 1 टक्क्याने कर्मचा-यांचे नुकसान होणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.