बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदार संघातच्या निवडणुकीत सत्यजित तांबेचा विजय झाला. त्यावर आता विविध खुलासे होत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्यासाठी लॉबिंग केले होते, असे म्हटले आहे. त्यामुळे बरीच चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत: प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना स्वत: फोन केला होता. यावेळी शरद पवार यांनी खर्गे यांच्याकडे सत्यजित तांबेंना नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी शरद पवारांनी म्हटले होते की, माझा जो अनुभव आहे, त्यावरुन सांगतो की, सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्या आणि हा विषय संपवून टाकावा, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा दावा अजित पवार यांनी केला. तसेच आतादेखील सत्यजित तांबे यांनी फार ताणू नये व काँग्रेस पक्षानेही मनाचा मोठेपणा दाखवावा.सत्यजित तांबे यांनी मधील एक महिन्याचा काळ विसरुन जावा आणि काँग्रेसचे सहयोगी म्हणून काम करावे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
(हेही वाचा साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी वेगळ्या विदर्भासाठी घोषणा )
Join Our WhatsApp Community