कसबापेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी भाजपाची नावे निश्चित; कुणाला मिळणार संधी?

149

भाजपाचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक (कसबापेठ मतदारसंघ) आणि लक्ष्मण जगताप (चिंचवड मतदारसंघ) यांच्या मृत्यु पश्चात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू-तू मैं-मैं सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांच्या गोटात चलबिचलता असली, तरी भाजपाचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली.

या दोन्ही मतदारसंघांबाबत शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा आणि शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत कसबापेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. सुरुवातीला कसब्याचे तिकीट मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीला देण्याबाबच चर्चा होती. मात्र, आता दुसरेच नाव समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत रासने यांचे नाव भाजपकडून निश्चित होऊ शकते.

चिंचवड विधानसभेसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवार देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दिल्लीतून होणार असल्याचे सांगण्यात आले.

(हेही वाचा साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी वेगळ्या विदर्भासाठी घोषणा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.