कोरोनाच्या बुस्टर डोसबाबतचा सेरो सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर

183
कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या पहिल्या व दुस-या मात्रेनंतर बुस्टर डोस घेणा-या मुंबईकरांच्या शरीरात ९९.९० टक्के प्रतिपिंडे तयार झाल्याचे पालिकेच्या सेरोच्या सहाव्या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. सरो सर्वेक्षणात गेल्या वर्षभरात दोन प्रमुख टप्प्यांत केले गेले. या दोन्ही सर्वेक्षणाच्या संशोधनात  कोरोना प्रतिबंधात्मक बुस्टर डोस घेतलेल्या मुंबईकरांमध्ये सेरो पॉझिटीव्हीटी दर ९९.९० टक्के आढळला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कोरोनाच्या दोन मर्यादित लसीकरण झालेल्यांच्या तुलनेत बुस्टर डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये प्रतिपिंडे तुलनेने अधिक आढळली, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाच्यावतीने दिली गेली.
 
पहिल्या टप्प्यामध्ये ३ हजार ९९ व्यक्ती सहभागी झाले होते. यात पालिका आरोग्य कर्मचारी, घन कचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. सहा महिन्यानंतर दुस-या टप्प्यामध्ये २ हजार ७३३ कर्मचा-यांची माहिती घेतली गेली. यात ५० टक्के फ्रंटलाईन कर्मचारी तर ५० टक्के आरोग्य सेवा कर्मचारी सहभागी होते.
 

(हेही वाचा भारतात लवकरच धावणारी हायड्रोजन ट्रेन आहे तरी काय?)

सेरो सर्वेक्षणातील मुद्दे

  • या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २,७३३ व्यक्तींपैकी ५९ टक्के व्यक्ती हे २५ ते ४५ वर्ष वयोगटातील होते, तर ४१ टक्के व्यक्ती हे ४५ ते ६५ वर्ष वयोगटातील होते.
  • तसेच यात ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के महिलांचा समावेश होता.
  • केवळ १.३ टक्के व्यक्तीच अशा होत्या, ज्यांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लशीचा एकच डोस घेतला होता. तर ५५ टक्के व्यक्तींनी दोन डोस घेतले होते आणि ४३ टक्के व्यक्तींनी लसीची वर्धक-मात्रा अर्थात प्रिकॉशन डोस सुद्धा घेतला होता. तसेच केवळ ०.७ टक्के सहभागी व्यक्तींनी कोविड-१९ लसीचा कोणताही डोस घेतला नव्हता.
  • चाचणी किटच्या तपशीलानुसार ५० AU/mL आणि त्याहून अधिक प्रतिपिंड संख्या असलेल्या कोणालाही सेरो पॉझिटिव्ह मानले जाते.
  • या सर्वेक्षणात फक्त एक व्यक्ती सोडून सर्व जण सेरो पॉझिटीव्ह आढळले. याचाच अर्थ सेरो पॉसिटीव्हिटी दर हा ९९.९ टक्के आढळला.
  • ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींची सरासरी प्रतिपिंड संख्या ही इतर वयोगटातील व्यक्तींपेक्षा अधिक होती.
  • ज्यांनी कोविड-१९ लशीची वर्धक-मात्रा (प्रिकॉशन डोस) घेतला होता, अशा व्यक्तींमध्ये दोन मात्रा घेतलेल्या लोकांपेक्षा अधिक प्रतिपिंडे आढळून आली.
  • ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत किंवा ज्यांनी वर्धक-मात्रा अर्थात प्रिकॉशन डोस घेतला आहे आणि ज्यांची कोविड-१९ चाचणी एकदा तरी सकारात्मक आलेली आहे, त्यांच्यात देखील कोविड-१९ ची चाचणी नकारात्मक आलेल्या व्यक्तींपेक्षा प्रतिपिंड संख्या अधिक आढळून आली आहे.
  • पहिल्या टप्प्याच्या तुलनेत सर्व सहभागी झालेल्यांपैकी ५७ टक्के व्यक्तींच्या प्रतिपिंड संख्येमध्ये घट दिसून आली. मात्र, असे असले तरीही ६ महिन्यांनंतर त्यांच्या शरीरात प्रतिपिंडांची पातळी लक्षणीय होती. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.