पं. शशांक कट्टी यांच्या सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट तर्फे “संगीत उपचार” पद्धतीचा प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम मुंबईत सुरू होणार आहे. या संगीतोपचाराची आणि अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी मोफत संगीत उपचार सेमिनार मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता उत्कर्ष मंडळ, महंत रोड एक्सटेन्शन, विलेपार्ले (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे.
संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब, पित्तविकार, अस्थमा, निद्रानाश, डिप्रेशन, काही मनोविकार इ. विविध विकारांवर शास्त्रीय संगीतावर आधारीत सुरावलींद्वारे संगीतोपचार कसे करावेत याचे प्रशिक्षण वरील अभ्यासक्रमात दिले जाईल. तसेच उच्चशिक्षित वैद्यकीय तज्ञांकडून सूर संजीवन म्युझिक थेरपीच्या शास्त्रविषयक मार्गदर्शनही केले जाईल. ‘म्युझिक थेरपी’ शिकण्यामध्ये ज्यांना रस आहे, अशांसाठी किंवा होतकरू तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून वैयक्तिकरित्या ते म्युझिक थेरेपिस्ट म्हणून भविष्यकाळात काम करू शकतात. अधिक माहितीसाठी 9820046920/9004671055 व www.sursmt.com यावर संपर्क साधावा. असे आवाहन सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
(हेही वाचा भारतात लवकरच धावणारी हायड्रोजन ट्रेन आहे तरी काय?)
Join Our WhatsApp Community