World cancer day : आकडे सांगतायेत पुढे धोका आहे

205

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च रजिस्ट्रीच्या अहवालानुसार मागील ३ वर्षांत देशात कर्करोग रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या अहवालानुसार २०१८ साली १३ लाख २५ हजार २३२, २०१९ साली १३ लाख ५८ हजार ४१५ आणि २०२० साली १३ लाख ९२ हजार १७९ कर्करोग रुग्णांची  संख्या होती. तर डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये भारतात १४ लाख २६ हजार ४४७ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले. हीच संख्या २०२२ मध्ये १४ लाख ६१ हजार ४२७ होती.

कोणत्या प्रकारच्या कर्करोगाची किती टक्केवारी? 

देशातील उत्तर आणि उत्तर-पूर्व भागात कर्करोग रुग्णांची संख्या वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशातील एकूण कर्करोग रुग्णांच्या संख्येत ४० टक्के रुग्ण हे फुफ्फुस (१०.६ टक्के), स्तनाचा कर्करोग (१०.५ टक्के), अन्ननलिका (५.८ टक्के), तोंडाचा कर्करोग (५.७ टक्के), पोटाचा कर्करोग (५.२ टक्के), यकृत (४.६ टक्के) आणि गर्भाशय (४.३ टक्के) रुग्ण आहेत.

(हेही वाचा World cancer day : खचून जाऊ नका; जाणून घ्या कर्करोगावरील उपचारासाठी कुठे मिळेल आर्थिक मदत?)

२०२५ पर्यंत कोणत्या कर्करोगाची किती रुग्ण संख्या असेल?  

एमएसडी फार्मासिटीकल प्रा. लि. कंपनीच्या समितीने भारतात २०२० मध्ये कर्करोग रुग्णांची किती संख्या होती आणि २०२५ मध्ये ती किती वाढेल याचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, २०२० मध्ये तंबाखूमुळे झालेल्या कर्करोग रुग्णांची संख्या ३ लाख ७७ हजार ८३० (२७.१ टक्के) होती. ती २०२५ मध्ये ४ लाख २७ हजार २७३ (२७.२ टक्के) होईल. आतड्यांच्या कर्करोग्यांची संख्या २०२० मध्ये २ लाख ७३ हजार ९८२ (१९.७ टक्के) होती, ती २०२५ मध्ये ३ लाख १० हजार १४२ (१९.८ टक्के) होईल. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२० मध्ये ७५ हजार २०९ (५.४ टक्के) होती, ती २०२५ मध्ये ८५ हजार २४१ (५.४ टक्के) होणार आहे. स्तनाच्या कर्करोग्यांची संख्या २०२० मध्ये २ लाख ५ हजार ४२४ (१४.८ टक्के) होती, ती २०२५ मध्ये २ लाख ३२ हजार ८३२ (१४.८ टक्के) होईल. गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोग्यांची संख्या २०२० मध्ये ७९ हजार ४०० (५.१ टक्के) होती, ती २०२५ मध्ये ७९ हजार ७६५ (५.१ टक्के) होईल. मुत्राशयाच्या कर्करोग्यांची २०२० मध्ये १ लाख २४ हजार ९३१ (९ टक्के) होती, ती २०५ मध्ये १ लाख ३८ हजार ५९२ (८.८ टक्के) होईल. प्रोस्टेट कर्करोग्यांची २०२० मध्ये ४१ हजार ५३२ (३ टक्के) होती, तर २०२५ मध्ये ४७ हजार ६८ (३ टक्के) होईल. मेंदुच्या कर्करोग्यांची संख्या २०२० मध्ये ३२ हजार ७२९ (२.४ टक्के) होती, ती २०२५ मध्ये ३६ हजार २५८ (२.३ टक्के) होईल.

जगभरात किती कर्करोग रुग्णांचा मृत्यू झाला?

ग्लोबोकॅन अहवालामध्ये जगभरात कर्करोगाने २०२० मध्ये १ कोटी ९३ हजार जणांचा मृत्यू झाला, २०२४ पर्यंत हीच संख्या २ कोटी ८४ हजार होणार आहे. याच अहवालात २०३५ पर्यंत भारतात कर्करोगाचे नवीन रुग्ण १७ लाख इतके होतील.

कर्करोग होण्यामागे कोणती कारणे किती कारणीभूत आहेत? 

केंद्रीय वैद्यकीय मंत्रालयाच्या अहवालात कर्करोग होण्यामागील कारणे दिली आहेत. त्यामध्ये तंबाखू आणि दारूचे व्यसन असणे हे कर्करोग होण्यासाठी ३३ टक्के कारणीभूत आहे. निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे कर्करोग होण्याची ३३ टक्के शक्यता आहे. संसर्गामुळे कर्करोग होण्याची शक्यता २० टक्के आहे. तर हॉर्मोन्समुळे १० ते २० टक्के कर्करोग होण्याची शक्यता असते. लोकसंख्या हे १ टक्के कारण असू शकते आणि व्यवसाय २ टक्के कारण कर्करोग होण्यासाठी ठरू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.