अग्निशमन दलाच्या भरतीप्रकियेत महिला उमेदवारांचा गोंधळ; पात्र उमेदवारांना अपात्र ठरवल्याचा आरोप 

137

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये महिलांची भरतीप्रक्रिया मागील दोन दिवसांपासून दहिसर येथे सुरु आहे. त्यासाठी शेकडोंच्या संख्येने महिला उमेदवार यासाठी उपस्थित आहेत. मात्र या महिला उमेदवारांनी आंदोलन सुरू केले आहे.

यासाठी १६२ सेंटीमीटर उंचीची मर्यादा देण्यात आली आहे. मात्र त्याहून अधिक उंची असलेल्या महिलांनाही भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आल्याचे आढलून आले. त्यामुळे महिला उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली. या ठिकाणी महिला उमेदवारांनी संताप व्यक्त करत तिथेच आंदोलन सुरु केले. तसेच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. यामुळे महिला उमेदवारांमध्ये आणखी संताप व्यक्त झाला. महिला उमेदवार आक्रमक बनल्या, त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ही भरतीप्रक्रिया पोलिसांनी करावी, अशी मागणी महिला उमेदवार करू लागल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.

(हेही वाचा मुंबई महापालिकेचा ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प: यंदाही १४ टक्क्यांनी वाढ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.