हेमंत रासणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदल्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आले नाही, का दिले नाही माहिती नाही? अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी व्यक्त केली. मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाला, असेही शैलेश टिळक यावेळी म्हणाले.
निर्णय मान्य मात्र मनात खंत
वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी राहिला आहे. मुक्ता टिळक यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी घरातील व्यक्तीला उमेदवारी द्या अशी मागणी मी केली होती. पण पक्षाने वेगळा निर्णय घेतला आहे. तो आम्हाला मान्य आहे. मात्र, मुक्ता टिळक यांच्या कामावर हा अन्याय असल्याची खंत शैलेश टिळक यांनी व्यक्त केली.
( हेही वाचा: भाजपकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाला संधी नाही; चिंचवडमधून लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला उमेदवारी )
फडणवीसांसोबत झाली चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी चर्चा झाली. उमेदवार देण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतून निर्णय होईल असे त्यांनी सांगितले होते. शनिवारी निर्णय होईल, असेही ते म्हणाले होते. तसेच, मुक्ता टिळक वारल्यानंतर घरी यायचे होते त्यामुळे फडणवीस शुक्रवारी घरी आले होते. तेव्हा त्यांनी काही तसे इंडिकेशन दिले नव्हते, असे शैलेश टिळक यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community