BMC Budget 2023-24 (Environtment):प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेचे ऍक्शन प्लान : मुंबई होणार धुळमुक्त,बांधकाम प्रकल्पांसाठी बनवली ही मार्गदर्शक तत्वे

131

मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेला रस्त्यांवरील व बांधकामातील धूळ, वाहतूक कोंडी, उद्योग व उर्जा क्षेत्र आणि कचरा जाळणे हे चार प्रमुख घटक कारणीभूत आहेत. मुंबई उद्भवलेल्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, वायू प्रदुषकांचे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत सात योजनांची घोषणा करण्यात येत आहे.

महापालिकेच्या सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आल्यानंतर प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत सात योजनांची घोषणा केली. विविध क्षेत्रांतील प्रदूषण केंद्रीकरण पातळीवर नियंत्रण ठेवणे; शहरासाठी बहुस्तरीय देखरेख धोरण सुरु करणे आणि प्रदुषणामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी नियोजनाचे विकेंद्रीकरण करणे आणि नागरीकांमध्ये आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करणे अशाप्रकारे  मुंबई स्वच्छ हवा उपक्रम तीन व्यापक उद्दीष्टांसाठी कार्य केले जाईल,असे त्यांनी अर्थसंकल्पात नमुद केले.

बांधकाम व निष्कासन कचऱ्याचा मोठा वाटा आहे. बांधकाम व निष्कासन कचऱ्याच्या प्रसाराचे प्रमाण ठरवणे आव्हानात्मक आहे. दररोज निर्माण होणाऱ्या या कचऱ्याचा योग्य अंदाज लावणे, बांधकाम प्रकल्पांचा मागोवा घेणे, कचरा तथा  डेब्रीज वाहून नेणारी वाहने झाकणे आणि पुनर्वापराकरीता नेल्या जाणाऱ्या कचरा तथा डेब्रीजवर योग्य ती देखरेख ठेवण्याच्या दृष्टीकोनातून  मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना अवलंबवण्यात आली आहे.

मुंबईत सुमारे ३५०० बांधकाम प्रकल्पांची कामे सुरु असून बांधकामाच्याठिकाणी ही काळजी घेताना हे प्रकल्प सुरु होण्यापूर्वी जुने इमारत पाडकाम केले जाते. त्यातूनही मोठ्याप्रमाणात धुळीचे प्रदुषण वाढते. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकरीता मार्गदर्शक तत्वांची उपाययोजना प्रकल्पाच्या ठिकाणी अवलंबण्यासाठी  मार्गदर्शक धोरण तयार करण्यात आले.

( हेही वाचा: BMC Budget 2023-24: महापालिका शाळांमधील विद्यार्थी बनणार स्वावलंबी: विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य विकासाचे धडे )

धुळमुक्त बनण्यासाठी बांधकामाच्या हे राहणार नियम

  • ज्या इमारतींचे बांधकाम / फिनिशिंगचे काम प्रगतीपथावर आहे त्या इमारतींच्या बाह्य भागावर धूळरोधक पडदे (डस्ट स्क्रिन) लावणे.
  • धूळरोधक पडद्यावर व तळ मजल्यावरील मोकळ्या जागेत पाणी शिंपडणे.
  • बांधकामाच्या ठिकाणावरुन बाहेर पडताना सर्व वाहनांची चाके धुणे. भंगार / बांधकाम कचऱ्याची वाहतूक करणारी सर्व वाहने झाकणे.
  • बांधकाम सुरु असताना पडणाऱ्या डेब्रीजपासून सुरक्षेसाठी जाळी बसविणे.

सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिच्या खाते आणि एजन्सींकरीता मार्गदर्शक तत्त्वे.

  • बांधकाम व निष्कासन कचरा प्रक्रिया प्रकल्प – प्रत्येकी ६०० टन प्रतिदिन क्षमतेचे २ प्रकल्प स्थापित उभारण्यात येतील.
  • बांधकाम व निष्कासन कचरा व्यवस्थापन नियम (२०१६) ची अंमलबजावणी.
  • IOD देताना इमारतीभोवती वाजवी उंचीपर्यंत GI शीट पडदे उभारणे अनिवार्य आहे.
  • RMCप्लांट मंजूर करताना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
  • बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी अटी
  • वाजवी उंचीपर्यंत GI शीट पडदे उभारणे बंधनकारक करण्याची अट IOD मध्ये आधीपासूनच समाविष्ट आहे.
  • RMC प्लांट मंजूर करताना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
  • ज्या इमारतींचे बांधकाम / फिनिशिंगचे काम प्रगतीपथावर आहे त्या भागावर धूळरोधक पडदे (डस्ट स्क्रिन) लावण्याबाबत प्रकल्प प्रस्ताव करण्यात येईल. मजल्यावरील मोकळ्या जागेत पाणी
  • शिंपडण्याबाबत धूळरोधक पडद्यावर व तळ प्रस्तावकांना निर्देशित करण्यात येईल. बांधकामाच्या ठिकाणावरुन बाहेर पडताना सर्व वाहनांची चाके धुण्याबाबत प्रस्तावकांना निर्देशित करण्यात येईल. भंगार / बांधकाम कचऱ्याची वाहतूक करणारी सर्व वाहने झाकण्याबाबत प्रक प्रस्तावकांना निर्देशित करण्यात येईल.- बांधकाम सुरु असताना पडणाऱ्या डेब्रीजपासून सुरक्षेसाठी जाळी बसविण्याबाबत प्रक प्रस्तावकांना निर्देशित करण्यात येईल.

रस्त्यावरील धूळ कमी करण्याचे उपाय: गेल्या दशकभरात शहराच्या एकूण प्रदुषण रस्त्यावरील धूळीचा वाटा दुपटीहून अधिक वाढला आहे. रस्त्यावरील धूळ मुख्यत्वे रखें बांधणी सामग्री, जसे की खड़ी व काँक्रीटच्या हाताळणी आणि प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या घन कणांमुळे वाढते. वाहनांच्या दळणवळणामुळे विशेषतः जास्त रहदारी असलेल्या भागात किंवा जेथे रस्त्याच्या पृष्ठभागाची झीज आणि टायरचे घर्षण जास्त असते अशा ठिकाणी धूळीकण निर्माण होतात व हवेत मिसळतात. शहरातील रस्त्यांवरील धूळ प्रभावीपणे कमी करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येतील.

  • रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी यांत्रिकी / ई-पॉवर स्वीपरचा वापर
  • रस्ते आणि पदपथांवरील धूळीस अटकाव करण्यासाठी स्पिंकलर खरेदी करणे
  • वाहन विराजित मिस्टिंग उपकरणे कार्यान्वित करणे
  • वाहन विराजित वायू शुद्धीकरण युनिट्स कार्यान्वित करणे
  • धूळ कमी करण्यासाठी Ionisation आधारीत वायू शुद्धीकरण प्रणाली
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.