BMC Budget 2023-24(Enviornment):येत्या डिसेंबर २०२३पर्यंत बेस्टचे ३४०० बसेस इलेक्ट्रीक

152

मुंबईमध्ये बेस्टच्या ताफ्यातील ४०० बसेस इलेक्ट्रीकवर आधारीत असून डिसेंबर २०२३ पर्यंत ३४०० बसेस या इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या असतील. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीतील १०० टक्के बसेस इलेक्ट्रीवर आधारीत बनवणारे देशातील हे पहिले शहर ठरेल, असा महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच सीएनजीवरील बसेसही मार्च २०२४ पर्यंत इलेक्ट्रीवर आधारीत असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पाची माहिती देताना प्रशासकांनी, वाहनांच्या वापरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे वायू प्रदुषणात रस्ते वाहतूकीचा मोठा वाटा आहे. म्हणूनच नागरीकांचा खाजगी वाहतूकीकडील कल कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मागणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे आणि कमी प्रवाशांसह खाजगी वाहनांचा वापर कमी करुन खासगी वाहनांचा वापर, तसेच जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करुन पर्यावरणस्नेही पर्यायांची मागणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

( हेही वाचा: BMC Budget 2023-24 (Environtment):प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेचे ऍक्शन प्लान : मुंबई होणार धुळमुक्त,बांधकाम प्रकल्पांसाठी बनवली ही मार्गदर्शक तत्वे )

 रस्त्यांवरील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी महानगरपालिका राबवणार या उपाययोजना…

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्याचे ई-वाहन ताफ्यात रुपांतर करणे आणि चार्जिंग सुविधा पुरविणे
  • बेस्ट करीता ३००० ईलेक्ट्रीक बसेस खरेदी करण्यात येत आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या डिझेल / पेट्रोल वाहनांचे सी. एन. जी. वाहनांमध्ये रुपांतर करणे.
  • २५८ वाहतूक नाक्यांवर पूर्णपणे वाहतूक अनुकूल नियंत्रण प्रणाली यापूर्वीच कार्यरत केली आहे. सदर प्रणाली अद्ययावत तंत्रज्ञानाने दर्जोन्नत करण्यात येईल आणि वाहतूक प्रवाह व प्रदुषणावरील परिणामाचा अभ्यास करुन उर्वरीत ३९५ वाहतूक नाक्यांवर सदर प्रणाली बसविण्यात येईल.
  • शाश्वत कचरा व्यवस्थापन उपाययोजना: काही ठिकाणी कचरा जाळल्यामुळे आणि अशाश्वत पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे धूलीकणांचे उत्सर्जन वाढून वायू प्रदुषणात भर पडते. हिवाळ्यात अधिक कचरा जाळल्यामुळे PM2.5ची मोठ्या प्रमाणात वाढ होते. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका खालील उपाययोजना अंमलात आणणार आहे.

अ) घरोघरी शाश्वत कचरा वर्गीकरणासाठी नागरीकांशी संवाद साधणे आणि जागरुकता निर्माण करणे.

ब) कचरा जाळण्यावर देखरेख आणि बंदीची अंमलबजावणी करणे.

क) देवनार क्षेपणभूमी येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे (टप्पा-१) बांधकाम प्रगतीपथावर आहे.

ड) देवनार क्षेपणभूमी येथे पूर्वापार असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग. इ) आठ ठिकाणी ४ टन प्रतिदिन क्षमतेच्या घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्रांची उभारणी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.