BMC Budget 2023-24 Best: बेस्टला महापालिका देणार ८०० कोटी रुपये

158

बेस्ट उपक्रमासाठी चालू आर्थिक वर्षाप्रमाणेच आगामी सन २०२३- २४च्या अर्थसंकल्पातही ८०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल अशाप्रकारची घोषणा प्रशासकांनी केली आहे. सन  २०२२-२३मध्ये, बेस्ट उपक्रमाला १३८२. २८कोटी एवढया आगाऊ रकमेचे अधिदान करण्यात आले असल्याचे प्रशासकांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक वाहतूकीचे महत्व लक्षात घेऊन, उपक्रमाच्या प्रचालन व्यवस्थेस सहाय्य म्हणून सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ८०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. विविध निकषांनुसार कामगिरी उंचावून तसेच संरचनात्मक सुधारणांद्वारे बेस्ट त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि महानगरपालिकेकडून मिळणा-या सहाय्यावरील अवलंबत्व नजिकच्या काळात कमी करेल, असा विश्वास प्रशासकांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा: BMC Budget 2023-24:कचऱ्यापासून होणारे प्रदूषण रोखणार: मुंबई लावणार १ लाख झाडे )

यापूर्वी देण्यात आलेले १ हजार ३८२ कोटी रुपये हे आगाऊ रक्कम दिली असली तरी ही रक्कम कर्ज म्हणून ग्राह्य धरण्याबाबत राज्य शासनाच्या निर्णयासापेक्ष ही आगाऊ रक्कम देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवृत्त् कर्मचाऱ्यांच्या उपदानासाठी  ४८२.२८ कोटी , निवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देणी भागवण्यासाठी ४५० कोटी रुपये  व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी उपक्रमाने घेतलेले अल्प मुदतीचे कर्ज फेडण्यासाठी ४५० कोटी आदी रकमांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.