आता स्लो नेटवर्कपासून होणार सुटका; टेलिकॉम कंपन्यांसाठी TRAI चा नवा आदेश

145

सध्या शॉपिगपासून ते शेअर मार्केटपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन होतात. त्यामुळे इंटरनेट थोडे जरी स्लो झाले तरी आपल्या कामात अनेक अडचणी येतात. मात्र आता अशा समस्या उद्भवणार नाहीत. कारण तुमच्या  इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. आता बॉडबॅंडची व्याख्या टेलिकॉम कंपनीने बदलली आहे. त्यानुसार टेलीकॉम कंपन्यांना ब्राॅडबँडसाठी किमान 2 MBPS स्पीड द्यावा लागणार आहे. सध्या भारतात ब्राॅडबँडचा स्पीड 512 KBPS एवढा आहे.

आता 2G आणि 3G सेवा ब्रॉडबँडच्या श्रेणीत येणार नाहीत, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे ज्या कंपन्यांना स्पर्धेत राहायचे असेल त्यांना आता ब्रॉडबॅंडचा स्पीड वाढवावा लागणार आहे.

निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा

भारतात ब्रॉडबँडचे साधारणत: 85 कोटी ग्राहक आहेत. यापैकी 82.5 कोटी ग्राहक मोबाईलवर ब्रॉडबँड वापरतात. तर अडीच कोटी लोकांकडे लँडलाइन ब्रॉडबँड आहे. TRAI च्या शिफारशींनुसार, डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनने टेलीकॉम कंपन्यांसाठी किमान 2MBPS स्पीड केला आहे. तसेच या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

( हेही वाचा: संगीत उपचार कसे करतात, जाणून घेण्यासाठी मोफत शिबीर )

5G मुळे इंटरनेटच्या वेगात लक्षणीय वाढ 

Speedtest Global Index नुसार, डिसेंबर 2022 मध्ये भारताच्या इंटरनेट स्पीडमध्ये सुधारणा झाली आहे. जागतिक क्रमवारीत भारत 79 व्या स्थानावर आहे. आधी हा क्रमांक 105 होता. तसेच मोबाईल डाउनलोड स्पीड 18.26 MBPS वरून 25.29 MBPS वर पोहोचला आहे. भारतात नुकतेच 5G सेवा सुरू झाली असल्यामुळे इंटरनेटच्या वेगात लक्षणीय वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.