नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना आव्हान देणाऱ्या शुभांगी पाटील यांनी शनिवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. काँग्रेसच्या तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीने पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.
शुंभागी पाटील या सुरुवातीला भाजपमध्ये होत्या. त्यांना पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने भाजपाने अखेरपर्यंत आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
( हेही वाचा: BMC Budget 2023-24: चहलांची निष्ठा शिंदे-फडणवीसांवरच: तब्बल सहा वेळा अर्थसंकल्पात नावाचा उल्लेख )
भाजपाचा कल हा सत्यजित तांबे यांच्या बाजूने झुकत असल्याचे हेरून त्यांनी उद्धव ठाकरे गटाशी संपर्क करत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवला. मात्र, त्या विजयश्रीला गवसणी घालू शकल्या नाहीत. नाशिक पदवीधर निवडणुकीत त्यांचा २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला. आता निवडणुकीचे वारे सरल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेत हाती शिवबंधन बांधले.
Join Our WhatsApp Community