मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण; माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरोधात गुन्हा दाखल

181

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादामधून मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार आहेत. त्याची पत्नी अँड्रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी केले आवाहन! म्हणाले, “जो उमदेपणा भाजपाने दाखवला, तोच उमदेपणा मविआ नेत्यांनी …”)

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात गुन्हा दाखल 

पत्नीच्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसांनी विनोद कांबळीवर भादंवि कलम ३२४ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मद्यधुंद अवस्थेत विनोद कांबळीने स्वयंपाक घरातील पॅनचे हॅंडल तिच्यावर फेकले यामुळे अँड्रिया यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही घटना शुक्रवारी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास घडल्याचे विनोद कांबळीच्या पत्नीने सांगितले आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. अँड्रियाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी विनोद कांबळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.