मुंबईतील आबालवृद्धांचे आकर्षण असणाऱ्या काळा घोडा महोत्सवात यंदा बेस्ट उपक्रमाच्या ऐतिहासिक प्रगतीचे प्रदर्शन पहायला मिळणार आहे. काळा घोडा महोत्सव समितीने बेस्टच्या महाव्यवस्थापकांना विनंती केल्यानुसार यावर्षीच्या महोत्सवात चर्चगेट जवळील आझाद क्रॉस मैदानात बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा आणि परिवहन सेवेच्या ऐतिहासिक जडणघडण आणि प्रगती बाबत निवडक वस्तुंचे प्रदर्शन दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत असणार आहे.
( हेही वाचा : पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी केले आवाहन! म्हणाले, “जो उमदेपणा भाजपाने दाखवला, तोच उमदेपणा मविआ नेत्यांनी …” )
काळा घोडा महोत्सवात प्रथमच दिसणऱ्या या प्रदर्शनाला तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. बेस्ट उपक्रमाच्या सुंदर अशा आणिक आगार येथील ऐतिहासिक म्युझियमला आपण विनामूल्य भेट देऊन आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद घेऊ शकता.
पत्ता – बेस्ट म्युझियम, प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, आणिक आगार, महानगर गॅस लिमिटेड समोर, मुंबई-४०००२२.
वेळ – सोमवार – सकाळी ७- दुपारी ३.३०
मंगळवार ते रविवार – सकाळी ९- सायंकाळी ५
दूरध्वनी – ७२०८९७११७२
Join Our WhatsApp Community