३४ विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा अचानक ब्रेक फेल; चालकाने मारली उडी अन्…

117

बारामतीच्या मोरगावातील एका खासगी क्लासच्या ३४ विद्यार्थ्यांची सहल रायगड किल्ल्यावर जात असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाले. अशा प्रसंगी चालकाने प्रसंगावधान दाखवत चालत्या बसमधून उडी मारली आणि चालत्या बसच्या खाली दगड टाकून ती बस थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. हा धडकी भरवणारा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असून चालकाच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. ३४ विद्यार्थ्यांची MH12 HC 9119 ही बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर सहलीसाठी जात होती. त्यावेळी अचानक बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाले. ही बाब लक्षात येताच चालकाने पहिल्यांदा रस्त्यावरच्या नागरिकांना सावध केले आणि चालत्या बसमधून स्वतः उडली मारली. मग चालती बस थांबवण्यासाठी धावत-धावत दगड शोधून तो चाकाखाली टाकला. यामुळे बस थांबली आणि मोठा अनर्थही टळला. या बसमधले सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – महिला डब्यात बसून प्रवास करणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालक आणि विद्यार्थ्यांना धीर दिला आणि वाहतूक कोंडी सोडवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.