कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचितच मन वळवणार का शिवसेना?; राऊत म्हणाले….

156

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची युती झाली. त्यानंतर कसबा आणि चिंचवडमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय झाला होता. पण आता या दोन्ही जागांवर शिवसेना लढत नसल्याचं दिसत आहे. असं असताना शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला वंचित पोटनिवडणुक लढण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिवसेना त्यांचं मन वळवणार का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं असून अजूनही वंचित आघाडी पक्ष महाविकास आघाडीचा घटक नाही, असं राऊत म्हणाले.

दरम्यान संभाजी ब्रिगेड आणि वंचित आघाडी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणाले की, निवडणुका होणारच आहेत. निवडणुका बिनविरोध होणारच नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी आवाहन करु द्या किंवा अन्य कोणी आवाहन करु द्या. त्या आवाहनाला काही अर्थ नाही. या दोन्ही निवडणुका होतील. जोरदार पद्धतीने आमच्याकडून लढल्या जातील. याबाबत मविआत कोणतेही मतभेद नाहीयेत. निवडणुका एकत्र लढायच्या, याच्यावर आम्ही ठाम आहोत. जरुर आम्ही आमची भूमिका चिंचवड संदर्भात व्यक्त केली की, ती जागा आम्ही लढू शकतो. याचा अर्थ आम्ही एकत्र बसून चर्चा करू. जसं कसब्यातून मविआकडून काँग्रेसला जागा मिळाली आहे. चिंचवडमध्ये काय होतंय याचा निर्णय सोमवारी व्हायला पाहिजे.

(हेही वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; काँग्रेस, राष्ट्रवादीने केले स्पष्ट)

वंचितचं मन वळवण्याच्या बाबतीत राऊत म्हणाले की, ‘अजूनही वंचित महाविकास आघाडीचा घटक नाही. संभाजी ब्रिगेड जरी हा राजकीय पक्ष नसला तरी यापूर्वी सुद्धा त्यांनी निवडणुका लढल्या आहेत आणि आम्ही यासंदर्भात सर्वांसोबत चर्चा करू.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.