‘अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल’, असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केल्यामुळे त्यांच्या टीकेची झोड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हांडासह शरद पवार, अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजित अजरुद्दीन आणि शरदचा समशुद्दीन झाला असता,’ असं म्हणत पडळकरांनी निशाणा साधला आहे.
नक्की काय म्हणाले पडळकर?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदु देवदेवतांविषयी आक्षेपार्ह विधान करतायत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून बोलत असतील, असं मला वाटतंय. जितेंद्र आव्हाडांना माहित नाही की, छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर हा जितुद्दीन झाला असता. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर अजितचा अजरुद्दीन झाला असता, शरदचा समशुद्दीन झाला असता.’
पुढे पडळकर म्हणाले की, ‘मताच्या राजकारणासाठी घाणेरड विधान करणं, घाणेरड राजकारण करणं ही पवारांची गेल्या ५० वर्षातील कुटनिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजे. पवारांकडून हे मतासाठी राजाकारण केलं जातंय हे महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितलं आहे आणि आजही बघतायत, निश्चितपणे लोकं त्यांना योग्य उत्तर देतील.’
(हेही वाचा – आम्ही टिळकांना उमेदवारी देतो, निवडणुक बिनविरोध करता का? चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आवाहन)
Join Our WhatsApp Community