1 एप्रिल 2023 पासून सरकारने ईपीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. याबाबत नुकतेच देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भविष्य निर्वाह निधी (PFशी) संबंधित नियमांत बदल केले आहेत. जर ईपीएफओच्या ग्राहकाने खाते उघडण्याची पाच वर्षे पूर्ण केली नाहीत आणि त्यांनी त्यांच्या खात्यातून पैसे काढले तर त्यांना आता कर भरावा लागणार आहे. तसेच, पाच वर्षांनंतर पैसे काढले तर टीडीएस कापला जाणार नाही. मात्र, पीएफ खात्यातून पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच पैसे काढले तर संपूर्ण रकमेवर टीडीएस कापला जाईल.
अर्थसंकल्पात टीडीएसबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, 1 एप्रिल 2023 पासून EPF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. आता पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाईल. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. तसेच, बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत. जर खातेदाराने 5 वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो. तर, 5 वर्षांनंतर कोणताही टीडीएस आकारला जात नाही.
( हेही वाचा: सरड्यासारखा बदलणार रंग तर चोचीसारखे दात, ‘असा’ असेल भविष्यातील मानव; अहवालातून माहिती समोर )
TDS साठी 10 हजार रुपयांची किमान थ्रेशोल्ड लिमिटदेखील बजेट 2023 मध्ये काढून टाकण्यात आली आहे. लाॅटरी आणि पजल्स बाबतीत 10 हजार रुपयांच्या मर्यादेचा नियम लागू राहील. एका आर्थिक वर्षात एकूण 10 हजारांपर्यंतच्या अमाऊंटवर टीडीएस कापला जाणार नाही. त्यानंतर टीडीएस कापला जाईल. ज्यांच्याकडे टॅक्स पॅन कार्ड आहे त्यांना कमी टीडीएस भरावा लागतो. जर एखाद्याचे पॅनकार्ड ईपीएफओच्या रेकाॅर्डमध्ये अपडेट केले नसेल तर त्याला 30 टक्क्यांपर्यंत टीडीएस भरावा लागेल. आता ते 20 टक्के करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community