जगभरात गुगलमुळे सर्व व्यवहार जलद होत आहेत. यामध्ये गुगल Chrome या ब्राऊझरचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे गुगल हे वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतो. नुकतेच गुगलने क्रोमसंबधी नवे फिचर्स (Google Chrome New Feature) आणले आहेत. या फिचर्समध्ये गुगलने क्रोम ब्राऊझरसाठी ‘क्विक डिलीट’ (Quick Delete) फंक्शन आणले आहे. यामुळे आता वापरकर्ते १५ मिनिटांपूर्वीचा ब्राऊझर हिस्ट्री डेटा डिलीट करू शकणार आहेत. तसेच गुगलने लिंक शेअर करण्याची सोपी पद्धत आणि क्रोममधील गुप्त टॅबसाठी ‘फिंगर प्रिंट’ लॉकची सुविधा दिली आहे. या नवीन फिचर्सचा फायदा वापरकर्त्यांना होणार आहे.
क्रोमच्या डेस्कटाॅप व्हर्जनवर अनेक वेळेच्या सुविधा दिल्या जातात. त्यानुसार, 24 तास, 7 दिवस, 1 महिना अशा सुविधा दिल्या जातात. त्यानंतर आता 15 मिनिटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. गुगल सध्या त्यावर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.
( हेही वाचा: घर खरेदी करताय? ‘या’ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा, रिसेलच्या वेळी होईल मोठा फायदा )
नवीन फिचर्सचे फायदे
- या फिचर्समुळे तुम्ही इतर कोणाच्या फोनवर Chrome वापरत असाल तर सर्च हिस्ट्री खाजगी ठेवू शकता.
- तसेच तुम्ही गोपनीय माहिती शोधत असाल तर या फिचर्सचा उपयोग होऊ शकतो.