कोरोना काळात सतत दोन वर्ष घरात कोंडलेल्या व्यक्तींची हाडे वयोमानापेक्षा अधिकच कमकुवत झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहेत. अपुरा सूर्यप्रकाश आणि व्यायामाच्या अभावामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हाडाचे दुखणे वाढल्याची तक्रार डॉक्टरांकडे नोंदवल्या जात आहेत.
वर्सोवा येथील धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या स्पाईन सर्जन विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पेशत्तीवार यांनी लॉकडाऊनमुळे सर्वच वयोगटातील माणसांमध्ये ड जीवनसत्व काही प्रमाणात कमी झाल्याची माहिती दिली. दोन वर्षांच्या काळात बऱ्याच जणांच्या व्यायामाच्या सवयीलाही खीळ बसली. परिणामी आता वृद्धांमध्ये फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढले, तर शस्त्रक्रिया दुपट्टीने वाढल्याची माहिती डॉ. पेशत्तीवार देतात. तरुणांमध्ये अंगदुखी तसेच पाठदुखी वाढत असल्याच्या तक्रारी सतत येत असल्याचेही डॉ. पेशत्तीवार म्हणाले. या वाढत्या तक्रारी पाहता चाळीशीनंतर महिलांनी तर पन्नाशीनंतर पुरुषांनी हाडांची तपासणी करून घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात.
(हेही वाचा तुर्कीतील भूकंपाबाबत ३ दिवसांपूर्वीच मिळालेले पूर्वसंकेत; ट्विट होतेय व्हायरल)
काय उपचार करता येईल
- दररोज किमान अर्धा तास चालणे
- शारीरिक व्यायाम करणे
- शरीराचा सूर्यप्रकाशात संपर्क येईल अशा दैनंदिन हालचाली ठेवा
- शरीरातील जीवनसत्वांची कमरतरता भरून निघण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट औषधे घेणे