कै. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिवे (ता. खेड) येथे व्याख्यानमाला संपन्न झाली. तीन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेत समाजप्रबोधन, राष्ट्रभक्ती, धर्मजागरण, समाजसेवा अशा विषयावर व्याख्यात्यांनी आपले विचार मांडले.
( हेही वाचा : १० मिनिटांमध्ये ५० वाहनांची टक्कर! चीनमध्ये भीषण अपघात)
कै. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालय व स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे हे २५ वे वर्षे आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी शैलजा सांगळे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर विचार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी मोहन शेटे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर विचार मांडले. तर तिसऱ्या दिवशी पार्थ बावस्कर यांनी राष्ट्रभक्तीचे एव्हरेस्ट स्वातंत्र्यवीर सावरकर यावर व्याख्यान दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या निधीतून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहासमोर २ लाख रुपये खर्चातून उभारलेल्या पत्राशेडचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तालुका संघचालक शिवाजी खराबी, रोहिदास गडदे, दत्ता भेगडे, बनसू होले, मंजू होले, दत्ता होले, शंकर ठाकूर, भास्कर रिकामे, सचिन शिवेकर, अमोल पानमंद, रवी चव्हाण, रवी गाढवे, शेखर करें, रोहित सरोज, संजय शिवेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळाचे अध्यक्ष समीर गडदे, सीताराम नवले, प्रमोद वाडेकर, चंद्रकांत बलकवडे, दत्तू शिवेकर, शरद वाडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community