कसबा निवडणूक बिनविरोध कराल, तर उमेदवारी टिळकांच्या कुटुंबात देऊ; चंद्रशेखर बावनकुळे

144

कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. या ठिकाणी कसाब मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्या आधीच भाजपला विरोध होऊ लागला आहे. त्या ठिकाणी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कुणाला तरी उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी भाजप टिळक कुटुंबात उमेदवारी देईल, परंतू त्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

महाविकास आघाडीने आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे कसबा निवडणूक बिनविरोधात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा पोटनिवडणुकीबाबत एक मोठे विधान केले आहे.

(हेही वाचा Turkey Earthquake: तुर्कीच्या संकटात भारताकडून मदतीचा हात; लवकरच NDRF पथकासह मदत सामग्री पाठवली जाणार)

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणूक बिनविरोधात करण्याबाबत 48 तासांत उमेदवार बदलतो, निवडणूक बिनविरोध करणार का? असे आव्हान महाविकास सरकारला  दिले होते. यावर आव्हानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळ आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाईल, चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्त्व विचार करेल, चंद्रकांत पाटील यांची भूमिका पक्षाला मान्य आहे, महाविकास आघाडीने आज तसे कळवते तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.