आरेतील विकासकामे, झोपडपट्टी पुनर्विकास योजना तसेच अतिक्रमणाविरोधात आरेतील आदिवासींनी सोमवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हाधिका-यांचा अनेक मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मोर्चाचे आयोजक कष्टकरी शेतकरी संघटनच्या विठ्ठल लाड यांनी दिली.
( हेही वाचा : खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे सुयश)
आरेत विकासकामे मोठ्या संख्येने सुरु असल्याने मूळ आदिवासींच्या अस्तित्वाला धक्का पोहोचला असल्याने, संतापलेल्या आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुंबईतील आदिवासी संकटात आहेत. या आदिवासींचा मूळ व्यवसाय शेती आहे. शेतजमिनींचा मालकी हक्क आमच्याकडे राहू द्या, आदिवासी पाड्यांना गावठाण घोषित करा, आदिवासी जमिनी भूमिलेख अभिलेखात नोंदीत करा, पाड्यांवर कॅम्प लावून जातीचे दाखले घ्या, मूलभूत मानवी सुविधा द्या, पाणी,रस्ते, आरोग्य सुविधा तसेच अंगणवाड्या आदींची मागणी आदिवासींनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली. या बहुतांश मागण्यांबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच खासगी विकासकामे आरेत नको, आरेतील आदिवासी पाड्यांची हद्द याबाबतील लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी पाड्यांना भेट देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आल्याचे कष्टकरी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community