भारतीयांचा प्रामाणिकपणा परदेशी नागरिकांना भावला; सोशल मीडियातून मात्र रवीश कुमारांवर टीका 

213
सध्या ट्विटरवर एका युरोपियन महिला नागरिकाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या महिलेचे पाकीट ट्रेनमध्ये हरवले असते, ते एका हॉटेलच्या मालकाला सापडते, त्यानंतर त्या परदेशी महिलेला त्या हॉटेल मालकाने पाकीट परत देतांना तिला त्या हॉटेल मालकाचा प्रामाणिकणा इतका भावला की, तिने त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियात व्हायरल केला. त्यामध्ये भारताची बदनामी करणारे वृत्त भारताबाहेर सर्रास प्रसारित केली जातात, मात्र वास्तवात इथे किती सकारात्मक वातावरण आहे, ज्याने मी भारावून गेले आहे, अशी ती महिला म्हणाली आहे. या व्हिडीओवरून मात्र नेटकऱ्यांनी भारताची बदनामी करणाऱ्या भारतातीलच महाभाग पत्रकार रवीश कुमार आणि आरीफ खानम या दोन पत्रकारांना चांगलेच झोडपून काढले.

काय आहे त्या व्हिडीओमध्ये? 

एका परदेशी महिलेचे पाकीट ट्रेनमध्ये हरवते. ते  चिराग नावाच्या हॉटेल मालकाला सापडते, तो त्याविषयी संबंधित महिलेला व्हाट्सअप वरून सविस्तर माहिती देतो. त्यानुसार ती महिला चिरागला भेटते तेव्हा पाकीट घेतल्यावर ती महिला चिरागला बक्षिसी म्हणून काही रक्कम देऊ करते पण चिराग तो न स्वीकारता तिलाच उलट धन्यवाद देतो, हे पाहून ती महिला प्रभावित होते. त्यानंतर ती महिला ‘मी खरोखरीच भारावून गेली आहे. भारताची बदनामी करणारी वृत्ते किती मोठ्या प्रमाणात भारताच्या बाहेर प्रसारित होत असतात, पण इथे मात्र सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळाले आहे. त्यावर त्या महिलेच्या सोबत असलेला पुरुषही ‘हा देश किती चांगला आहे’, असेही म्हणतो.

काय म्हणतात नेटकरी? 

वकील ज्ञानमूर्ती शर्मा यांनी ट्विट करत म्हटले की, अरफा खानम आणि खबीस कुमार देशाची बदनामी करण्यासाठी परदेशातून सुपारी घेतात…., असे म्हटले.

तर समीर नावाचा व्यक्ती म्हणतो, मला युरोपियन जोडप्याचे ट्विटर हँडल माहित नाही नाहीतर काही देशद्रोही भारताचे नकारात्मक चित्र पसरवत आहेत आणि अजूनही पसरवत आहेत त्याची माहिती त्यांना दिली असती. असे मी म्हटले असते.

द किंग नावाच्या व्यक्तीने तर, वाह रवीश कुमार भी ये न्यूज़ देख चुल्लू भर पानी में डूब मरेगा, असे म्हटले.

तर जितू भैय्या म्हणाले, रवीश आणि अरफा खानम सारख्या अनेक मीडिया भंडांना सुनियोजित अजेंडा घेऊन देशात प्रायोजित केले गेले आहे. प्रत्येक देशभक्ताला भक्त म्हणून शिव्या देणे हा या अजेंड्याचा भाग आहे. आज देशद्रोहीांकडून देशभक्तांना शिव्या घालणे ही तथाकथित प्रबुद्ध पत्रकारिता होत आहे, असे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.