‘बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतच नाहीत’; थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

122

माजी मंत्री आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही, असे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये म्हटले आहे. बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतच नाही. कारण, त्यांची प्रकृती चांगली नाही, असे पटोले म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये मोठा कलह पाहायला मिळाला. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत थोरात यांना पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरात यांचे विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत होते. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर त्यांच्याकडे पक्षनेते पद ठेवायचे का यावर निर्णय होणार होता. पण त्यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे कांग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

( हेही वाचा: मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला कोणत्याही क्षणी होणार अटक; काय आहे प्रकरण )

नाना पटोलेंकडून थोरातांना शुभेच्छा 

नाना पटोले म्हणाले की, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांनी मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो, अशा मी सदिच्छा देतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.