वीरेंद्र सेहवागचे अदानी समुहाला समर्थन; म्हणाला, गोऱ्यांना सहन होत नाही भारताची प्रगती

182

अमेरिकन फॉरेन्सिक फायनान्शियल कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातून अदानी समूहावर सामाजिक फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडबाबत गंभीर आरोप केल्यानंतर गौतम अदानींसह शेअर बाजारावर मोठे पडसाद उमटले आहेत. जगातील सर्वात टॉप-२० श्रीमंतांच्या यादीतून गौतमी अदानी बाहेर झाले आहेत. त्यात आता या प्रकरणात भारताचा माजी क्रिकेटपटून वीरेंद्र सेहवागही सामील झाला आहे. सेहवागने ट्वीट करत अप्रत्यक्षपणे गौतम अदानी ग्रुपला समर्थन केले आहे.

काय म्हणाला सेहवाग?

‘भारताची प्रगती गोर्‍यांकडून सहन केली जाऊ शकत नाही. भारतीय बाजारपेठेत जी काही पडझड होत आहे, हे सुनियोजित षडयंत्र असल्याचे दिसते. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी भारत नेहमीच मजबूत राहिल’, असे वीरेंद्र सेहवागने ट्विट केले आहे.

सेहवागच्या ट्वीटवर चाहते काय म्हणाले?

सेहवागच्या या ट्विटनंतर त्याचे चाहते कॉमेंट बॉक्समध्ये एकमेकांना भिडले आहेत. काही लोकांनी त्याला अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स विकत घेण्यासाठी सल्ला दिला आहे, तर काहींनी सांगितले की, गोर्‍यांचे समर्थन करणारे अनेक लोक देशात आहेत.

काही दिवसांपूर्वी अदानी एंटरप्रायझेसने २० हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला होता. याबाबत अदानी समूहाने परिपत्रक जारी केले होते. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणुकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचे अदानी समूहाने परिपत्रकात सांगितले होते.

(हेही वाचा – खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे सुयश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.