राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरावरुन टीका होत आहे. भाजपानेही आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले त्यामुळे आता संभाजीराजे आक्रमक झाले आहेत.
ट्वीट करत आव्हाडांवर साधला निशाणा
संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य ते करत असतात हे करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असे ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहेत.
( हेही वाचा: वरळी राहू द्या, मी ठाण्यातून लढून दाखवतो; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान )
आव्हाड काय म्हणाले होते?
महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केले होते. एमपीएससीमधून महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करुन टाकला. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितले की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटले तर की शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत, यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आले आहे, असे आव्हाड म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community