भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील चार सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दोन्ही संघ या सामन्याच्या सरावासाठी कसून तयारी करत आहेत. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या बाॅर्डर- गावस्कर ट्राॅफी 2023 साठी नागपुरात सराव करत आहे. दरम्यान, त्याने अनबाॅक्स न केलेला त्याचा नवीन फोन हरवला आहे. त्याने फोन हरवल्याबद्दल एक ट्वीट शेअर केले. या स्टार फलंदाजांचे ट्वीट काही वेळातच व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
विराट कोहलीचे ट्वीट काय?
ट्वीट करत विराट कोहली म्हणाला की, तुमचा नवा फोन अनबाॅक्स न करता हरवण्याच्या दु:खापेक्षा मोठे काही नाही. माझा फोन कोणी पाहिला आहे का? असे तो म्हणाला. त्याच्या या ट्वीटरवर विविध रिप्लाय येत आहेत. यावर झोमॅटोनेदेखील कमेंट केली आहे. झोमॅटोने लिहिले आहे की, अनुष्का वहिनीच्या फोनवरुन आईस्क्रीम ऑर्डर करा. कोहलीचे चाहते त्याला ट्वीट करत विविध सल्लेदेखील देताना दिसत आहेत.
( हेही वाचा: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का! दिग्गज खेळाडू निवृत्त )
feel free to order ice cream from bhabhi's phone if that will help 😇
— zomato (@zomato) February 7, 2023
@yuzi_chahal Goli Beta Masti nai Uncle ko unka Phone Vapis Dedo…. pic.twitter.com/JnyRmCpzA1
— Darshan Bathhiya (@Dar5hh) February 7, 2023
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 9 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तर तीन एकदिवसीय सामनेदेखील खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने 9 फेब्रुवारीपासून 9:30 पासून खेळवले जातील. पहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी, दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारी, तिसरा सामना 1 ते 5 फेब्रुवारी, तर चौथा सामना 9 ते 13 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. नागपूर, दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद असे अनुक्रमे सामने खेळवले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community