पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आता देशातील महत्त्वाच्या लोकांना टार्गेट करून मारण्याची योजना आखत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती आली आहे. पीएफआयच्या बिहार मॉड्यूलचा तपास करताना एनआयएच्या हाती ही धक्कादायक माहिती लागली. देशातील धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी पीएफआय ‘टार्गेट-किलींग’च्या योजनेवर काम करीत आहे.
( हेही वाचा : मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी सेवा सुरू, किती असणार भाडे?)
‘एनआयए’ला मिळाली धक्कादायक माहिती
गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयच्या बिहार मॉड्यूलमधील फरार आरोपी याकूब हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. गुप्तचर संस्थेच्या तपासात असे आढळून आले आहे की, बिहारच्या चकिया भागात राहणारा याकूब गेल्या दीड वर्षांपासून सशस्त्र प्रशिक्षण देत होता, मात्र पीएफआयवर बंदी येताच त्याने आपला मार्ग बदलला. पीएफआयच्या या बिहार मॉड्यूलने याकूबला ज्या महत्त्वाच्या लक्ष्यांसाठी शस्त्रे आणि दारुगोळा पोहोचवला होता त्यांची यादी तयार केली होती. वास्तविक, बंदीनंतर पीएफआय पुन्हा आपली उपस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, तपासात असेही समोर आले आहे की, गेल्या दीड वर्षात याकुबने बिहारमध्ये सुमारे 1 डझन प्रशिक्षण शिबिरे चालवली आहेत. फुलवारी शरीफ, बेतिया, दरभंगा, मोतिहारी, कटिहार, पूर्णिया, अररिया, मधुबनी आणि बिहार शरीफ येथे ही शिबिरे घेण्यात आली.
गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅम्प चालवणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर याकूब आणि त्याच्या साथीदारांनी भूमिगत होऊन शस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली. गेल्या 3 दिवसात, एनआयएने पीएफआयच्या बिहार फुलवारी शरीफ मॉड्यूलशी संबंधित 3 लोकांना अटक केली आहे, तर अनेक लोक अजूनही त्यांच्या निशाण्यावर आहेत.
Join Our WhatsApp Community