BCCI च्या महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची तारीख ठरली असून बहुप्रतिक्षित WPL चा पहिला हंगाम हा ४ मार्च ते २६ मार्च या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिल्या हंगामाचे आयोजन यंदा मुंबईत करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : ‘पीएफआय’ने आखली ‘टार्गेट-किलींग’ची योजना! NIA कडे धक्कादायक माहिती)
हंगामातील पहिला सामना हा गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रेंचायजींच्या संघात होण्याची शक्यता आहे. WPL साठी १३ फेब्रुवारीला मुंबईत लिलाव होणार आहे. BCCI ने पाच संघाच्या लिलावातून तब्बल ४६६९.९९ कोटी रुपये कमावले आहेत. तर लीगच्या प्रसारण हक्काचा लिलाव करून त्यातून BCCI नेक ९५१ कोटी रुपये कमावले.
वुमन्स प्रिमियर लीगमध्ये ५ संघांचा लिलाव करण्यात आला असून सर्वाधिक बोली अहमदाबादच्या संघासाठी लागली होती. अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला १२८९ कोटी रुपयांत खरेदी केले. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला ९१२.९९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने महिला टिमसाठी ९०१ कोटी रुपये मोजले आहेत. वुमन्स लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत ४६६९.९९ कोटी इतकी झाली आहे.
WPL संघ
- अहमदाबाद – १२८९ कोटी – अदानी स्पोर्ट्सलाइन
- मुंबई – ९१२.९९ कोटी – इंडिया विन स्पोट्सलाइन
- बंगलोर – ९०१ कोटी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- दिल्ली – ८१० कोटी – JSW GMR क्रिकेट
- लखनौ – ७५७ कोटी – कॅपरी ग्लोबल होल्डिंग्स