Indian Railway : ट्रेनमध्ये जनरल डबे पुढे किंवा शेवटीच का असतात? काय आहे खरे कारण?

272

भारतात रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरले आहे. भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे सुद्धा प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध योजना उपलब्ध करून देत असते. एवढ्या प्रवाशांची ने-आण करताना रेल्वेला सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा काळजी घ्यावी लागते. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की, रेल्वेचे जनरल डबे पुढच्या किंवा मागच्या बाजूला का असतात? मध्यभागी हे जनरल डबे का लावले जात नाहीत? जनरल डब्यांसाठी विशिष्ट जागा का असते याविषयीचे कारण जाणून घेऊया…

( हेही वाचा : IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना)

प्रत्येक रेल्वे गाड्यांची रचना ही सारखीच असते. अलिकडच्या सर्व गाड्यांमध्ये इंजिन त्यानंचर एसी ३, एसी २, स्लीपर कोच, विशेष डबे त्यानंतर शेवटी जनरल डबे असतात किंवा इंजिनच्या मागोमाग जनरल डबे असतात. यावर ट्विटरवर अनेकदा आरोप करण्यात आले होते. दुर्घटना झाल्यास यामुळे सर्वात जास्त फटका मागे अथवा पुढच्या डब्यांना होतो यामुळे गरीब प्रवाशांचे नुकसान होते असा आरोप करण्यात आला परंतु हे आरोप रेल्वेने फेटाळून लावले आहेत.

रेल्वेने काय म्हटले?

ट्विटरवर एका व्यक्तीकडून करण्यात आलेले हे सर्व आरोप रेल्वेने फेटाळून लावले आहेत. ट्रेनसंदर्भातील नियमावलीनुसार प्रत्येक डब्यांची जागा ही ठरलेली असते. यामध्ये डब्यांची श्रेणी महत्त्वाची नसते असे रेल्वेने म्हटले आहे.

जनरल डबे शेवटी किंवा सुरूवातीला का असतात, खरे कारण काय?

जनरल डब्यांमध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने डब्यांचा क्रम ठरवला जातो. जनरल डबे ट्रेनच्या अगदी पुढे किंवा मागे जोडले जातात. जनरल डब्यांमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे संतुलन ठेवण्यासाठी हे डबे सुरूवातीला किंवा शेवटी असतात. मध्य भागावर हे डबे ठेवल्यास जास्त वजन होणार आणि ट्रेनचे संतुलन राहणार नाही. तसेच सिटींग अरेंजमेंट, इतर व्यवस्थांवरही परिणाम होईल म्हणून हे डबे मध्यभागी नसतात. ट्रेनच्या एका बाजूला असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा या डब्यांमधून लगेच प्रवाशांना बाहेर काढता येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.