गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील पुलाचे काम एक खांबासह केबल स्टेडवर : नेमावा लागला नवीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार

254

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता ( जीएमएलआर) प्रकल्पाच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक केली असली तरी भविष्यात या मार्गावरील उड्डाणपुलांची कामे आता एक स्तंभी आधारीत केली जाणार आहे. यामध्ये डॉ हेगडेवार चौकाच्या ठिकाणी लांगोरदोरावर थांबणारे पूल बांधले जाणार असून या कामाची पाहणी व देखरेख करण्यासाठी नव्याने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारपदी टेक्जेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? ‘या’ दोन नावांची चर्चा)

गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या (जीएमएलआर)माध्यमातून पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. जीएमएलआर प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील गोरेगांव येथील पश्चिम हुतगती महामार्ग आणि पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग एकमेकांना जोडले जातील.

जीएमएलआर प्रकल्पाची एकूण लांबी १२.२ कि.मी. असून त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून ४.७ कि.मी.लांबीच्या बोगद्याचे काम केले हाती घेतले जात आहे आणि गोरेगांव फिल्मसिटीमध्ये १. ६ कि मी लांबीचा पेटी योगा मार्गाचे काम घेतले आहे. जीएमएलआर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पूर्व-पश्चिम उपनगरातील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून मुक्तता होण्यास मोठया प्रमाणात मदत होईल.

टप्पा तीन मध्ये यापूर्वी तांत्रिक सल्लागार म्हणून टीपीएफ इंजिनिअरींगची नेमणूक केली आहे. परंतु या मार्गावरील गोरेगाव दिडोंशी कोर्ट येथील रत्नागिरी चौक ते फिल्मसिटी पर्यंत सहा पदरी उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा येथील चक्रीय पूल, मुलुंड हेगडेवार चौक येथे सहा पदरी उड्डाणपूल आणि जीएमएलआर व पूवद्रुतगती महामार्गाच्या चौकामध्ये सहापदरी उड्डाणपूल आदींचे बांधकाम हे एक स्तंभ आहे. तसेच डॉ हेगडेवार चौकावर लांगोरदोरावर अर्थत केबल स्टेडद्वारे पुलाच्या कमानी उभारल्या जाणार आहे. त्यामुळे या कामाची पाहणी व देखरेख करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने सादर केलेली सर्व संकल्पचित्रे, आराखड्यासह या कामांची दैनंदिन देखभाल तसेच प्रकल्प कंत्राटदाराने सादर केलेल्या देयकांची तपासणी आदींसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मागवलेल्या निविदेमध्ये टेक्नोजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली. यासाठी या कंपनीला विविध करांसह ६ कोटी ४६ लाख ८ हजार दिले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.