दहा वर्षांपूर्वीचे आधार कार्ड त्वरीत अद्ययावत करून घेण्याचे आवाहन

121

बायोमेट्रीक प्रमाणिकरणासह रहिवाशांची ओळख पटवण्याच्या तरतुदीसह आधार हा ओळखीचा सर्वात व्यापक पुरावा म्हणून स्वीकारला जातो. रहिवाशांना सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारचा वापर सक्तीचा केला जात आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशांना नवीन आणि अद्ययावत तपशीलासह आधार सादर करणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील ज्या रहिवाशांना 10 वर्षाहून अधिक काळ आधार कार्ड मिळालेले आहे, परंतू त्यांनी एकदाही ते अपडेट केले नसेल, अशा रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन त्यांचा पत्ता पुनश्चः सत्यापीत करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील 31 लाख 52 हजार 947 नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध झालेले आहे. यापैकी 10 लाख 73 हजार 340 आधारकार्ड कागदपत्रे अद्ययावत करिता प्रलंबित आहेत. तरी आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेल्या तथापी, अपडेशन न केलेल्या नागरिकांनी ओळखीचे व पत्यासंबंधी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रामध्ये जावून दस्ताऐवज सादर करून अद्ययावतीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचा एकनाथ शिंदे छोटी छोटी आव्हाने स्वीकारत नाही, मोठी आव्हाने स्वीकारतो! मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार)

तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (18 वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी www.sangli.nic.in वर पाहावयास उपलब्ध आहे.

शुन्य ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांनी आधार नोंदणी केलेली आहे अशा बालकांची दर पाच व दहा वर्षांनी बॉयोमेट्रीक अपडेट करणे अनिवार्य आहे. वयानुसार बोटांचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यामध्ये बदल होत असल्याने बायोमेट्रीक अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा मुलांचे आधार कार्ड हे बायोमेट्रीक अद्ययावत न केल्यास निष्क्रीय होऊ शकतात. यासाठी आपल्या नजीकच्या आधार सेवा केंद्रावर जावून नि:शुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.

आधार सेवा देणाऱ्या केंद्राबाबत आपणास कोणतीही तक्रार असल्यास संचित पवार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, मोबाईल नंबर 9021026898 व विपुल मद्वाण्णा, वरिष्ठ सहाय्यक अभियंता, मोबाईल नंबर 9921317151 माहिती तंत्रज्ञान कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याशी त्वयरी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.