तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे एकूण ६० पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, विविध पदांसाठी भरती प्रकिया राबवण्यात आली आहे. पात्र उमेदवार HPCLच्या hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाईटवरून अधिक माहिती मिळवू शकतात. तसेच अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी आहे.
( हेही वाचा : पाकिस्तानी क्रिकेटपटूवर २ वर्षांची बंदी! भ्रष्टाचार प्रकरणामुळे केली कारवाई )
कोणकोणत्या पदांसाठी भरती :
- असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन(Assistant Process Technician)
एकूण जागा – ३०
शैक्षणिक पात्रता – B.Sc. किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे - असिस्टंट बॉयलर टेक्निशियन(Assistant Boiler Technician)
एकूण जागा – ०७
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण किंवा ITI, बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र(प्रथम श्रेणी)
वयाची अट – १८ ते २५ वर्षे - असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर(Assistant Fire & Safety Operator)
एकूण जागा -१८
शैक्षणिक पात्रता – (i) बारावी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा ६० टक्के गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
वयाची अट -१८ ते २५ वर्षे - असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (Assistant Maintenance Technician-Electrical)
एकूण जागा – ०५
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : १८ ते २५ वर्ष