अग्नीपथ योजनेअंतर्गत नव्या पद्धतीने दोन टप्प्यात सैन्यात भरती केली जाणार आहे. अग्नीवीर भरती प्रक्रिया 2023-24 साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी पोर्टल 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 दरम्यान खुले राहणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तर गोव्यातील दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा या जिल्ह्यातील अविवाहीत पात्र युवकांनी अर्ज करावा, असे आवाहन कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयाने केले आहे. संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना पाच परीक्षा केंद्र निवडावी लागणार आहेत. ऑनलाईन संयुक्त प्रवेश परीक्षा 12 एप्रिल 2023 पासून घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अग्निवीरसाठी पात्रता
- वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
- शिक्षण – पदांनुसार
- ट्रेड्समन – ८ वी पास ४५ टक्के
- ट्रेड्समन – १० वी पास ४५ टक्के
- जनरल ड्युटी – १० वी पास ४५ टक्के
- टेक्निकल – १२ वी सायन्स पास – ५० टक्के
- नर्सिंग – १२ वी सायन्स पास – ५० टक्के
- लिपिक – १२ वी पास (कोणतीही शाखा ) – ६० टक्के