…तर उद्योगपती आमदार, खासदार फोडून पंतप्रधान-मुख्यमंत्री होतील – उद्धव ठाकरे

146

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सुनावणीबद्दल माहिती दिली आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे सांगून शिवसेना एकच आहे आणि राहणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिंदे गटाचे १६ सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले?

सुरुवातील उद्धव ठाकरे म्हणाले की, पत्रकार परिषद ही जनतेला माहिती देण्याचे माध्यम आहे. गेली सहा महिने शिवसेनेचे काय होणार? पाठित खंजीर खुपसणाऱ्यांचे काय होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून नियमित होणार आहे. निवडणुक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. शिवसेना एकच दुसरी मी मानत नाही. आम्ही आमचे मुद्दे मांडलेले आहेत. त्याचसाठी आज पत्रकार परिषद घेतली.

‘त्या पक्षाला काही अर्थ नाही, त्याला गद्दारी म्हणतात’

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोणताही पक्ष जनतेच्या आधारावरती स्थापन होत असतो, त्याचप्रमाणे शिवसेना एका हेतुने शिवसेनाप्रमुखांनी १९६६ साली स्थापन केली. जर का पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरती अवलंबून राहणार असेल तर मला असे वाटते की, उद्या कोणीही जगातले दोन नंबर, तीन नंबरचे उद्योगपती आमदार, खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्या पक्षाला काही अर्थ नाही, त्याला गद्दारी म्हणतात. पक्ष हा दोन पातळीवर असतो एक वैधानिक, आपल्याकडे महाराष्ट्रात म्हटले तर विधीमंडळ आणि तिकडे संसदीय आणि त्याच्या पलीकडचा जो मोठा पक्ष असतो तो रस्त्यावरचा असतो. जो पक्ष आपला नेता आणि आपली घटना, जी शिवसेनेला आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे स्वतःची घटना बनवलेली आहे. त्या घटनेनुसार निवडणूका होतात.’

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंनी आधी स्वः पापांचा राजीनामा द्यावा; आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल)

या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल अशीही अपेक्षा

‘दरम्यान आम्ही सगळ्या कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. पक्षांतर्गत लोकशाही प्रमाणेच शिवसेना निवडणुका घेतो. २० जूनला पक्षादेश मोडला. काही परत आले. गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा नीचपणाचा कळस होता. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली निघेस्तोवर निवडणुक आयोगाने घेऊ नये. या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल अशीही अपेक्षा आहे. अपात्रतेचा मुद्दा अगोदर निकाली निघायला हवा असे आमचे मत आहे. आमचा लोकशाही, न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे. आमची बाजू भक्कम आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.