महाड MIDC मध्ये भीषण आग! ५ जण जखमी

167

महाडच्या MIDC मधील मल्लक स्पेशालिटी या कारखान्यात बुधवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कारखान्यातील इथिनोल ऑक्साईड प्लांटला ही आग लागली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून याठिकाणी स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. अखेर २ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

( हेही वाचा : आदित्य ठाकरेंनी आधी स्वः पापांचा राजीनामा द्यावा; आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल)

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश 

दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. घटनास्थळी १० फायर फायटर आणि खाजगी टॅंकरच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली गेली. काही ठिकाणी अद्याप आग सुरू आहे असे सांगण्यात येत आहे तसेच या आगीत ३ जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेजारच्या कंपनीत घातक रसायन असल्याने संपूर्ण परिसर रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली याचे मुख्य कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसून ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तरीही आगीची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.