कसबा-चिंचवड पोटनिवडणुक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली; ‘या’ नेत्यांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी

147

राज्यातल्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. त्यामुळे आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक जिंकण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. भाजपकडून चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप लढणार आहेत. तर कसबामधून हेमंत रासने यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आता ही पोटनिवडणुक जिंकण्यासाठी भाजपने चांगलीच रणनीती आखली असून काही पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.

दरम्यान सुरुवातीला कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न केले गेले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले फोन करून आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्राद्वारे पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही महाविकास आघाडी निवडणूक बिनविरोध न करण्यावर ठाम होती, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली.

आता या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आणि भाजपने आपापले उमेदवार उतरवले आहेत. शिवाय या निवडणूकीत आम आदमी आणि हिंदू महासभेच्या उमेदवारांचीही एंट्री झाली आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपने काही पदाधिकाऱ्यांनाही मोठी जबाबदारी दिली आहे.

कोणाला दिली कोणती जबाबदारी?

भाजपचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ – निवडणूक प्रभारी
आमदार माधुरी मिसाळ – कसबा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख
धीरज घाटे – निवडणूक सहप्रमुख
दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप – चिंचवड पोटनिवणुकीसाठी निवडणूक प्रमुख

(हेही वाचा – …तर उद्योगपती आमदार, खासदार फोडून पंतप्रधान-मुख्यमंत्री होतील – उद्धव ठाकरे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.