मालेगाव महानगरपालिकेत परीक्षेविना थेट भरती, असा करा अर्ज

134

मालेगाव महानगरपालिका नाशिक येथे फायरमन पदासाठी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रकिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर आणि नमूद केलेल्या तारखेस सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

पदाचे नाव – फायरमन/ अग्निशमन विमोचन

  • पद संख्या – ५०
  • शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तार्ण तसेच राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा
  • शारीरिक पात्रता
    पुरूष उमेदवाराची उंची – १६५ सेंटीमीटर
    महिला उमेदवाराची उंची – १६२ सेंटीमीटर
  • वजन – ५० किलो
  • पगार – १४,००० दरमहा
  • मुलाखत दिनांक – २२ फेब्रुवारी २०२३(वेळ – दुपारी ११ ते २)
  • मुलाखतीचा पत्ता – अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर, मालेगाव, नाशिक.
  • वयोमर्यादा – सर्वसाधारण उमेदवार : १८ ते ३८
  • मागासवर्गीय उमेदवार : १८ ते ४३
  • मुलाखतीला येताना पुढील कागदपत्रे सोबत आणावी-
    जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी-बारावी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रक, अग्निशमन प्रशिक्षण प्रमाणपत्रक, उच्च शैक्षणिक धारक असल्यास त्याचे गुणपत्रिका, पासपोर्ट फोटो

उमेदवारांसाठी सूचना

उमेदवारांच्या प्रमाणपत्राची छाननी करून फक्त पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी, अपात्र उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही. सदरची पदे ही विशिष्ट कालावधी करिता व ठोस मानधन तत्त्वावर फक्त कामाचा निपटारा करण्यासाठी आहे. या पदांचा कायमस्वरूपी फायदा मिळणार नसल्यामुळे त्यावर दावा करता येणार नाही. याची नोंद घ्यावी असे मालेगाव महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.