मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळीमधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. पण आता आपण दोघे राजीनामा देऊ तुम्ही वरळी जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात येऊन लढतो असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. यानंतर आता आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री तर दूरच आधी माझ्याशी निवडणूक लढवून जिंकून दाखवा, असं आव्हान रवी राणांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.
‘आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन माझ्या बडनेरा विधानसभा क्षेत्रात उभं राहावं. रवी राणा निवडणूक लढवायला तयार आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळी खासदार नवनीत राणांनी देखील आव्हान दिलं होत. त्यावर उद्धव ठाकरे बोलले नाहीत. आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आव्हान दिलंय. मात्र मुख्यमंत्री तर दूरच आधी माझ्याशी निवडणूक लढवून जिंकून दाखवा,’ असं खुलं आव्हान आमदार रवी राणा यांनी आदित्य ठाकरेना केलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात देखील मी उभं रहायला तयार आहे, अशीही प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.
(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाली नाही; पोलीस अधिकाऱ्यांचा खुलासा)
Join Our WhatsApp Community