‘मोदी चाय वाले थे, तो मैं पानीपुरी वाला हूॅं’; नरेंद्र मोदींचा ड्युप्लिकेट विकतो पाणीपुरी

168

कॉंग्रेसने चायवाला म्हणून नरेंद्र मोदींचा उल्लेख तुच्छतेने केला असला तरी ही सबंध भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. कारण सर्वसामान्य घरातली व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर इतकी मोठी झाली. काहींनी तर आपल्या चहाच्या स्टॉलचं नाव मोदी चाय ठेवल्याचं आढळून आलं आहे. मोदींची लोकप्रियता इतकी आहे की ती लोकप्रियता लहान स्तरावर व्यवसाय करणार्‍यांना फायदेशीर ठरली आहे.

आता इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचा फायदा कसा सर्वसामान्य माणसांना होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. नरेंद्र मोदींसारखी दिसणारी एक व्यक्ती गुजरातमध्ये पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करते. गुजरातच्या वल्लभ विद्यानगरमधील मोटा बाजारमध्ये त्यांचं दुकान आहे. यांचं नाव आहे अनिल ठक्कर. परंतु नरेंद्र मोदींसारखा चेहरा असल्यामुळे लोक त्यांना मोदी म्हणून ओळखतात. मोदींचा ड्युप्लिकेट पाहा इथे: https://www.instagram.com/reel/CoNVYM0jYQ1/?utm_source=ig_web_copy_link त्यांचा बाजूचा चेहरा आणि कपड्यांची पद्धत अगदी नरेंद्र मोदी यांच्या सारखीच आहे. म्हणून लोक म्हणतात की ठक्कर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसतात. ठक्कर म्हणतात की ’मोदी जी चहा वाले होते, मी पाणी पुरी वाला आहे. लोक सांगतात की काका, जर तुम्ही पाणीपुरी विकत नसता व चहा विकत असता तर तुमची खूप प्रगती झाली असती. ’ ठक्कर १५ वर्षांचे असल्यापासून पाणीपुरी विकत आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांचा आवाज सुद्धा मोदींसारखाच आहे. त्यांचा हा व्हिडिओ पुष्कळ व्हायरल झाला आणि या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. नरेंद्र मोदींसारखा चेहरा असल्यामुळे त्यांना चांगलाच फायदा होत आहे. (हेही वाचा ‘ईडी’मुळे विरोधक एकत्र, विरोधकांनी धन्यवाद मानावे; पंतप्रधान मोदींची टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.