तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूंकपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत 15 हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून 20 हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त जणांना ढिगा-यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, भूंकपामुळे 10 भारतीय नागरिकही तुर्कीत अडकले असून, एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा म्हणाले की, भूंकपामुळे 10 भारतीय नागरिक तुर्कीमुळे अडकले आहेत. ते सध्या सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, एक भारतीय नागरिक दोन दिवसांपासून बेपत्ता असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. तसेच, आम्ही संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत. याबरोबरच टर्कीतील भारतीयांसाठी अंकारा येथे विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
( हेही वाचा: अदानींचं रॉकेट सुसाट; Adani Enterpriseच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांची तेजी )
भारतीय विमाने भूंकपग्रस्त भागात दाखल
भारताने आतापर्यंत चार सी -17 विमाने तुर्कीमध्ये पाठवली असून यापैकी दोन विमानात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तर इतर दोन विमानात वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत. तसेच, एक सी-130 विमान वैद्यकीय पथकासह सीरियालाही रवाना झाले असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक अतुल करवाल यांनी दिली.
Join Our WhatsApp Community